सेन. ऑसॉफ यांनी भारत आणि अमेरिका यांमधील आधीच महत्त्वाचे असलेले संबंध अबाधित ठेवण्यासाठी राजकारण आणि व्यावसायिक क्षेत्रातील पुढाऱ्यांसोबत बैठका केल्या
मुंबई, भारत – अमेरिकी सेनेटर जॉन ऑसॉफ यांनी आज भारताचा आठ दिवसांचा अर्थसंबंधी दौरा सुरू ठेवला.
काल सेनेटर ऑसॉफ यांनी संपूर्ण मुंबईमधील विद्यार्थी आणि अधिकारी यांची भेट घेतली होती.
सोमवारच्या आपल्या दौऱ्यादरम्यान, सेनेटर ऑसॉफ यांनी भारत आणि अमेरिका यांमधील संबध पुढारण्यासाठी राजकारणी नेते आणि प्रमुख व्यावसायिक अधिकाऱ्यांची भेट घेतली.
सेनेटर ऑसॉफ यांनी भारतातील तरुणांसमोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांबद्दल त्यांचे मत थेट जाणून घेण्यासाठी मुंबईतील जयहिंद कॉलेजसोबत चर्चेचे आयोजन केले.
दुपारी, सेनेटर ऑसॉफ यांनी,अमेरिकेतील थेट परकीय गुंतवणुकीच्या संधी आणि भारत व जॉर्जिआ राज्यातील व्यापार यांबद्दल चर्चा करण्यासाठी, इंडिआ एक्झिम बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बंगारी, आणि इंडिआ एक्झिम बॅंकेच्या ज्येष्ठ नेतॄत्वासोबत द्विपक्षीय बैठक आयोजित केली.
दुपारच्याच वेळी, सेनेटर ऑसॉफ यांनी जॉर्जिआ राज्यातील आदित्य बिर्ला ग्रुपच्या गुंतवणुकीची चर्चा करण्यासाठी आणि जॉर्जिआ व भारतीय व्यवसायामधील नाते अजून घट्ट करण्यासाठी,आदित्य बिर्ला ग्रुपमधील वरिष्ठ अधिकारी, संतरूप मिश्रा,सतीश पै आणि इला पटनाईक यांची भेट घेतली. आदित्य बिर्ला ग्रुप जॉर्जिआमध्ये मुख्यालय असलेल्या नॉवेलिस आणि बिर्लाकार्बन या व्यवसायांची मूळ कंपनी आहे.
सेनेटर ऑसॉफ यांनी नवी दिल्लीमधील कार्यकारी डिप्टी चीफ ऑफ मिशन असलेले ब्रायन हेल्थ आणि मुंबईतील कॉंसल जनरल माइक हॅंकी यांसारख्या भारतातील वरिष्ठ अमेरिकी मुत्सद्यांशी भारत-अमेरिका व्यापार, आर्थिक आणि सुरक्षा प्राथमिकतांचीही चर्चा केली.
सेन.ऑसॉफ अमेरिका आणि भारत यांमधील संबंध बळकट करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत आहेत.
जूनमध्ये, सेन.ऑसॉफ यांनी दोन्ही देशांमधील अबाधित सहयोगासाठीच्या संधींवर प्रकाश टाकण्यासाठी अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीत संधू यांची भेट घेतली आणि जॉर्जिआमधील भारतीय समुदायाच्या आड येणाऱ्या प्रमुख काळजीच्या मुद्द्यांचा समाचार घेतला.
याच महिन्यात, सेन.ऑसॉफ यांनी देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिन साजरे करत असलेल्या भारतीय व्यक्तींसाठी एक व्हिडिओ संदेशही सामायिक केले होते.